Bhor news ! भोरच्या पर्यटनाला चालना देणार : खासदार सुप्रिया सुळे : हिर्डोशितील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका दुर्गम डोंगरी असला तरी तालुक्यात निसर्गरम्य असे वातावरण आहे.तालुक्यात अनेक महत्वाची पर्यटन स्थळे असून पर्यटनसाठी देशातून, राज्यातून जास्तीत जास्त पर्यटक भोर तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे कसे आकर्षित होतील या दृष्टीने पर्यटन स्थळांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून भोरच्या पर्यटनाला चालना देणार असल्याचे मत महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्याच्या पश्चिमेकडील हिर्डोशी ता.भोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन व्यक्त प्रसंगी केले.
            खासदार सुळे पुढे म्हणाल्या हिर्डोशी खोऱ्यातील अनेक गावांमधील रुग्णांना हिर्डोशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उत्कृष्ठ आरोग्य सेवा मिळणार आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य सेवेचा फायदा घ्यावा.कार्यक्रमप्रसंगी दवाखान्यासाठी विना मोबदला जागा देणाऱ्या ज्ञानोबा मालुसरे व धोंडीबा मालुसरे या सत्कारमूर्तींचा सन्मान खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत भाठे, माजी उपसभापती विक्रम खुटवड,सुनील भेलके,माजी शहराध्यक्ष नितीन धारणे,तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कराळे, सरपंच सुनीता मालुसरे,लक्ष्मण दिघे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
To Top