सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरुम (ता. बारामती) येथील मुरुम विविध कार्यकारी सोसायटीचे संशयास्पद कामकाजाबाबत १५ वर्षाचे टेस्ट ऑडीट करून कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने कक्ष अधिकारी संग्राम डुबल यांनी सहकार आयुक्त व निंबधक सहकारी संस्था पुणे यांनी दिले आहेत.
मुरुम येथील प्रकाश किसनराव जगताप यांनी याबाबत सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे सोसायटीची चौकशी व्हावी अशी मागणी पत्राद्वारे केली होती.
प्रकाश जगताप यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सोसायटीमध्ये फर्निचर व कामकाजामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच सभासदांना लाभांश बसत नसताना लाभांश देणे, राखीव निधीवर कर्ज काढणे व परतफेड न करणे यांसारख्या बाबी सोसायटीमध्ये घडत असल्याने संस्थेचे टेस्ट ऑडीट व कलम ८३ अंतर्गत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यावर राज्य सरकारने पत्रात दिलेल्या मुद्द्यांची आवश्यक चौकशी करुन कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधितांना द्याव्यात तसेच कार्यवाहीचा अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.