सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर - प्रतिनिधी
स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्मृतीनिमित्त पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार भोर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रीरंग ज्ञानेश्वर रवळेकर यांना बेल्हे ता.जुन्नर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात नाशिक पदवीधर संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
भोर तालुक्यातील बाजी पासलकर माध्यमिक विद्यालय बाजारवाडी ता.भोर येथे कार्यरत असलेले श्रीरंग रवळेकर यांचे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असून त्यांना तालुकास्तरीय आदर्श तसेच रोटरी क्लब गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.यावेळी राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा रावसाहेब आवारी, महाराष्ट्र राज्य टीडीएफ कार्याध्यक्ष जि. के.थोरात, रयत शिक्षण संस्था विश्वस्त उदय पाटील,जिल्हा संघ उपाध्यक्ष डी.एस.कुमकर,भोर तालुका टीडीएफ अध्यक्ष जयवंत थोपटे, हनुमंत शिंदे, अशोक वीर उपस्थित होते.