सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर, वेल्हा, मुळशीतील १८ पानंद रस्त्यांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत /पानंद रस्ते योजनेअंतर्गत आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून लवकरच या पानंद रस्त्याचे काम सुरू होणार आहे.
भोर विधानसभा मतदारसंघातील पानंद रस्त्यांना मंजूरी मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे येण्यासाठी तसेच माल वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.पानंद रस्त्यांच्या मंजुरीमध्ये इंगवली, करंजे, कुड ली खुर्द,कुरुंजी, टिटेघर, ब्राम्हणघर,वे.खो.,मोहरी बु.,वरवे खु.,वेळू,शिंदेवाडी, हर्नस( ता.भोर) तर वेल्हा तालुक्यातील घावर,चीर्मोडी,साखर तसेच मुळशीतील आंबेगाव ,भुकुम,लवार्डे या गावांचा समावेश आहे.