सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
तालुक्याच्या पूर्वेकडील भागातील सारोळे ता.भोर परिसरातील शाळांमध्ये भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने श्री एज्युकेशन सर्विसच्या मनीषा वेर्णेकर व मंगल येडवे यांच्यामार्फत सुजाण पालकत्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.ही कार्यशाळा सारोळे परिसरातील कीकवी,भोंगवली,न्हावी, वाठारहिंगे व सारोळा येथील शाळांमध्ये उत्साहात पार पडली.
हस्ताक्षर सुधार उपक्रम व सुजान पालकत्व या विषयांवर कार्यशाळा झाली.यात स्वयम ज्योती ट्रेनिंग व डेव्हलपमेंट सेंटरच्या संस्थापक अध्यक्ष सीमा वाघ यांनी पालकांना मार्गदर्शन केले.यावेळी माजी उपसभापती रोहन बाठे,राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा थोपटे,युवा कार्यकर्ते पृथ्वीराज थोपटे, बाजार समिती संचालक महेश धाडवे, दत्तात्रय भिलारे ,भगवान भांडे ,सुरेश कोळपे, मुख्याध्यापक एस.एस.ताकवले उपस्थित होते.दरम्यान रोहन बाठे यांनी चार विद्यालयांना वाटर कूलर भेट दिले.