सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ता बारामती येथील सह्याद्री पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगदी त्याच उत्साहामध्ये सह्याद्री पब्लिक स्कूल येथे योगा दिन साजरा करण्यात आला होता. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वेगवेगळी आसणे केली. वज्रासन ,मज्जासन, सिद्धासन ,वक्रासन, गोमुखासन, वृक्षासन, भुजंगासन. अशी वेगवेगळी असणे मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी केली.
त्यावेळी सह्याद्री पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, प्राचार्य अजित वाघमारे, खताळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS