बारामती ! आगामी काळात कोर्‍हाळे बु l हे गाव अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाईल : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
कोर्‍हाळे बुद्रुक गावातून ज्ञानाच्या दिंडीची सुरुवात झाली असून, आगामी काळात कोर्‍हाळे बुद्रुक हे  गाव अधिकाऱ्यांचे गाव म्हणून आपली नवी ओळख निर्माण करेल, असा विश्वास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला.
        आयोजीत केलेल्या नावीन्य पुर्ण उपक्रमांचे कौतुक केले. प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ' सन्मान गुणवंतांचा' या कार्यक्रमात बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर होते. जगताप बोलताना पुढे म्हणाले की, आगामी काळामध्ये  कुटुंबामध्ये असलेली उच्च शिक्षित मुले - मुली हेच त्या कुटुंबाचं भांडवल म्हणून ओळखली जातील. या प्रसंगी डॉ. प्रवीण गायकवाड, सुनील भगत, व सत्कारमूर्ती ची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे यांनी केले, समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आमचे मित्र मंडळ नेहमीच खंबीरपणे उभे राहते. यापुढेही परंपरा अशीच सुरु  ठेवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. म्हणाली की, ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत. ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
           सत्काराला उत्तर देताना प्रताप धापटे सांगितले की ज‍िल्हा पर‍िषद शाळा दर्जा सुधारक असून याचे श्रेय सर्व शिक्षकांना जाते, जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय नोकरी हे एक प्रभावी माध्यम असून, आपल्या पदाचा वापर समाजाच्या वंचित घटकांना न्याय देण्याबरोबरच गावचा विकास साठी योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले,
उपविभागीय कृषी अधिकारी पदावर निवड झालेल्या सोबती खोमणे गावडे यांनी सांगितले की कठोर परिश्रम केल्यास आपल्याला यश निश्चित मिळते असा माझा अनुभव आहे, मुंबई शहर पोलीस पदावर निवड झालेल्या कुमारी पूजा पवार हिने सांगितले की माझे वडील आई व आजोबा निरक्षर असून, मजुरी करून उदरनिर्वाह करतात. शारदा नगर येथील पोलीस अकॅडमी मध्ये मिळालेले प्रशिक्षण, जन्मजात कष्ट करण्याची सवय, तसेच प्रदीप धाकटे व प्रमोद पानसरे यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन यामुळे मलाही यश शक्य झाले.
Neet परीक्षेमध्ये 665 गुण मिळवणारी स्वामिनी गुरव आपल्या भाषणामध्ये म्हणाली की, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रथम क्रमांकाचे प्रताप धापटे यांचे बक्षीस मी कधीच सोडले नाही, तसेच आज पर्यत मी प्रताप धापटे यांना कधी पाहीले नव्हते. बाक्षीसापोटी आलेल्या पुस्तका मधुन मला वाचनाची प्रेरणा म‍िळाली व आवड न‍िर्माण झाली.
 मंडळ कृषी अधिकारी पदावर निवड झालेल्या कुणाल खोमणे यांनी सांगितले की गाव पातळीवरच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे करियर निवडण्यासाठी मुलाची मदत होईल.
Neet नीट परीक्षेत ५६५ गुण मिळवलेल्या अजित कारंडे यांनी बालविवाह सारख्या सामाजिक विषयावर भाषणात  बोलताना त्यांनी सांगितले की मी धनगर समाजाचा मेंढपाळ व्यवसाय असलेल्या कुटुंबातील असून आमच्या समाजात 14 वर्षे वर्षाच्या आतच मुला मुलींची लग्न केली जातात त्यामुळे मुली - मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, उपस्थित मान्य वरांनी आमच्या समाजातीी लोकांचे समुपदेशन करावे असे मत व्यक्त केले कार्यक्रमासाठी सोमेश्वर ची मा. चेअरमन राजवर्धन शिंदे, जि.प.बांधकाम चे मा. प्रमोद काकडे, युवा नेते रविराज तावरे, सोमेश्वरच्या व्हाईस चेअरमन प्रणिता खोमणे, बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, शिरुर ता. खरेदी विक्री संघाचे मा चेअरमन ॲड. देवराम धुमाळ, सुनील भगत, लालासाहेब माळशिकारे,  दूध संघाच्या संचालिका, शोभा जगताप, लालासाहेब नलवडे, बाळासाहेब जगदाळे, पुष्पलता जगताप, आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, उद्योजक संजय निकम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रमोद पानसरे यांनी केले.
To Top