सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
नीरा भिवरा पडता दृष्टी !
स्नान करिता शुद्ध सृष्टी!
अंती तो वैकुंठप्राप्ती !
ऐसे परमेष्ठी बोलिला !!
महर्षी वाल्मिकी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वाल्हे नगरितून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आटोपून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यासाठी प्रस्थान केले.
बळीराजाच्या व निसर्ग सृष्टीच्या मदतीला पाऊस लवकर धाऊन यावा असा भावपूर्ण निरोप माउलींनी पांडुरंगाला द्यावा हि मागणी वाल्हेतील भक्तांनी केली.
वाल्हे नगरीत पालखी सोहळा मुक्कामी आला असता वाढलेल्या पालखी महामार्गामुळे अनेक दिंड्यांच्या मुक्कामाच्या जागा गेल्याने त्या दिंड्यांना नवीन जागा शोधताना तारांबळ उडाली तरीही सर्वांनी कोणतीही कुरबुर न करता रात्री जमिनीला अंग टेकले सकाळी नियोजित वेळेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नीरा नगरीतील विसाव्यासाठी आणि नीरा नदीत माऊलींचे पादुकांना शाही स्नान घालण्यासाठी प्रस्थान केल्यानंतर पिसुरटी रेल्वे गेट मध्ये पुढे रस्ता अपुरा असल्याने पालखी सोहळ्यातील वाहने आणि चालणारी वैष्णव यांना मार्गस्थ होताना अडचण आली चालताना वारकऱ्यांची तारांबळ उडत होती पिंपरी विहीर येथे पालखी सोहळा विसावला सकाळची न्याहारी झाल्यानंतर पुन्हा मार्गस्थ होऊन पिंपरी खुर्द गावात पालखी सोहळा आल्यानंतर जनतेने मोठ्या भक्ती भावाने स्वागत केले त्यानंतर थोड्याच वेळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नीरा नगरीत आगमन झाले नीरा नगरीतील जनतेने वाजत गाजत आणि फुले उधळत माऊलींचे आणि वैष्णवांचे स्वागत केले स्वागतप्रसंगी नीरा सरपंच तेजश्री काकडे उपसरपंच राजेश काकडे माजी सभापती दत्ता चव्हाण विराज काकडे चंद्रकांत धायगुडे डॉ दगडे, पृथ्वीवर चव्हाण, संदीप धायगुडे विजय धायगुडे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे कल्याण जेथे ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी व नीरा नगरीतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
पालखी सोहळा विसावल्यानंतर निरा व निरा परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान केले रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी पतसंस्था व नागरिक यांनी वैष्णवांना चहा नाश्ता बिसलरी फळे वाटप केले. मागच्या वेळेपेक्षा यावेळी प्रत्येक दिंडीत समाज मोठ्या प्रमाणात आहे शासनाने पाण्याचे वाढीव टँकर वारकऱ्यांना जलद आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय मदत पथके तैनात केली आहेत याचबरोबर साथीचे आजार पसरू नयेत म्हणून विविध उपाययोजना केले आहेत दुपारच्या विसाव्यानंतर माऊलींच्या पादुकांना आज नीरा नदीमध्ये शाही स्नान सोहळा पार पडून सातारा जिल्ह्यात प्रवेश होणार आहे.