सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
स्वतःच्या वाढदिवसानिमित्त समाजामध्ये निरनिराळे उपक्रम राबविणारे लोक समाजात आपण पाहत असतो. मात्र भोर तालुक्यातील उत्रौली येथील तरुण प्रा.चेतन शिवतरे यांनी स्वतःचा वाढदिवस हिर्डोस मावळ खोऱ्यातील वरंधा ता.भोर घाटातील निरा-देवघर धरण क्षेत्रातील विविध प्राणी,पशु-पक्षी यांना फळे, धान्य तसेच पाणी देऊन साजरा केला
चेतन शिवतरे स्वतः उच्चविद्या विभूषित असून ते स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनियर) आहेत.
भोर तालुक्यातील राजगड अभियांत्रिकी या महाविद्यालयांमध्ये ते स्वतः प्राध्यापक आहेत. त्यांनी या शिक्षणाक्षेत्रामध्ये संशोधन सुद्धा केलेले आहे.भोर महाड रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शोधनिबंध चेतन शिवतरे यांनी लिहिला होता आणि एका राष्ट्रीय परिषदेमध्ये त्याचे अभिवाचन सुद्धा केले. त्यांच्या शोधनिबंधामुळे समाजातील सर्वच स्तरांमधून कौतुक झाले होते.या उपक्रमानंतर त्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त वन्य पशु - पक्षी तसेच इतर प्राण्यांसोबत अशा प्रकारे वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक नवीनच आदर्श घालून दिलेला आहे.यावेळी अमोल खेसे , महेश थोपटे, विकास शिंदे व दत्तात्रय वरे उपस्थित होते.