वेल्हे बिग ब्रेकिंग ! मीनल कांबळे ! राजगड पायथ्याला एका २६ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यु : नुकत्याच झालेल्या एमपीएसी परीक्षेत दर्शनाने राज्यात मिळवला होता सहावा क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
वेल्हे तालुक्यातील राजग़ड पायथा येथे सतीचा माळावर एका २६ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मुत्यु झाला असल्याची माहीती वेल्हे पोलीसांनी दिली.आत्महत्या कि घातपात याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
         किल्ले राजगड पायथा येथील सतीचा माळ येथे एका अज्ञान तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहीती पोलीसांना
मिळाली.ताबडतोब वेल्हे पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता,मयताच्या बाजुला पांढ-या रंगाचे बुट,गुलाबी कव्हर असलेला मोबाईल,काळ्या रंगाचा गॅागल,काळ्या रंगाची बॅग,काळ्या निळ्या रंगाचे जर्कींग पडलेले सापडले,घटनास्थळांची पाहणी केल्यानंतर पोलीसांनी
वायरलेसवरुन संदेश दिल्यानंतर पुणे येथील सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये हरवल्याची तक्रार दाखल करण्यात
आली होती त्याप्रमाणे तरुणीच्या वडीलांना वेल्हे पोलीसांनी बोलावुन घेतले मयताची ओळख पटली असुन याबाबत मुलीचे  वडील दत्ता दिनकर पवार ( वय ४७) सहजानंदनग ता.कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी सांगितले कि माझी मुलगी  दर्शना दत्ता पवार ( वय २६) एमपीएसीमधुन महाराष्ट्र राज्यात ६ वी आली असुन परिक्षेत्र वनअधिकारी म्हणुन तिची निवड झाली आहे.
         दि ९ जुन रोजी सत्कारासाठी पुणे येथील स्पॅाटलाईट अकेडमी येथे आली होती.त्यानंतर दुस-या दिवशी
सायंकाळी ४ वाजेपर्यत संपर्कात होती त्यानंतर फोन करुनही फोन उचलला नाही अॅकेडमीत चौकशी केल्यानंतर समजले कि दर्शना व तिचा मित्र राहुल दत्तात्रय हंडोरे यांचे सोबत किल्ले सिंहगड व राजगड पाहण्यासाठी गेले होते.त्यानंतर ते दोघेही संपर्कात आले नसुन परत माघारी देखील आले नाहीत.त्यामुळे पुणे येथील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये मुलगी दर्शना दत्ता पवार हिची हरवल्याची तक्रार दाखल केली होती.त्यानंतर वेल्हे पोलीसांचा फोन मुलीच्या वडीलां सोबत असलेला आदील जाधव यांच्या मोबाईलवर आला.त्यानंतर घटनास्थळी गेल्यानंतर माझीच मुलगी दर्शना दत्ता पवार असल्याचे वडील दत्ता पवार यांनी सांगितले.हा घातपात
आहे कि आत्महत्या याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंदुबर आडवाल,ज्ञानदिप धिवार व इतर पोलीस 
करीत आहेत.सतीच्या माळावरुन मयताला पायथ्याशी आणण्यासाठी पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ,व गावातील युवकांनी केले
To Top