सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : चंद्रकांत भाट
सैनिक टाकळी येथील बाबाई खंडू पाटील यांचा मंगळवारी कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्याच दिवशी बाबाई यांचा मुलगा गोपाळला डेंगू आजाराची लागण झाल्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने भारती हॉस्पिटल मिरज येथे ऍडमिट केले होते. गोपाळ यांच्या प्रकृतीने औषध उपचारास प्रतिसाद न दिल्याने रात्री उशीरा बाबाई यांचा मुलगा गोपाळ यांचा मृत्यू झाला.
आई पाठोपाठ मुलांचा मृत्यू झाल्याने सैनिक टाकळी वर शोककळा पसरली आहे. सैनिक टाकळी येथे डेंगू आजाराची किमान 80 रुग्ण संख्या आहे. त्यापैकी
औषध उपचाराने काही बरे झाले आहेत. तर काही उपचार घेत आहेत. तर काही संशयित आहेत. आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सैनिक टाकळीच्या पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळून कुटुंबातील करता धरता पुरुष त्यानी गमावला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे कायमस्वरूपी वैद्यकीयआरोग्य अधिकारी याची वानवा असल्याने टाकळीतील प्राथमिक आरोग्य केंद्र प्रभारी डॉक्टरांच्या भरोसे सुरू आहे. अवघ्या दोन दिवसात कुटुंबातील दोन व्यक्तीवर काळाने घाव घातल्याने पाटील कुटुंब हतबल झाले आहे.
बाबाई पाटील ह्या मंगळवारी कृष्णा नदीत बुडून मयत झाल्या तर आज त्याचा मुलगा गोपाळ यांचे पहाटे निधन झाले. गोपाळ यांला डेंग्यू ची लागण झाली होती. त्याच्यावर मिरज येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
भाजपचे नेते पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील यांचे भाऊ आणि आई होत्या. दरम्यान सैनिक टाकळी मध्ये डेंग्यू चा पहिला बळी गेला तरी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.डेंगू आजाराबाबत गावात घरोघरी जाऊन उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी जोरदार मागणी होत आहे.