सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
सध्याचे युग स्पर्धात्मक आहे.युवकांनी शालेय शिक्षण घेवून आपल्या कर्तृत्वावर व्यवसायात संधी निर्माण करून आपली व कुटुंबाची प्रगती करावी असे उदगार मेढा नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग जवळ यांनी काढले.
मेढा येथील मेढा मोहाट रोडलगत असणारे कदम मार्केट येथे संदिप रमेश धनावडे आणि गौरी संदिप धनावडे यांनी नव्याने सुरू केलेल्या धनावडे एंटरप्रायजेस आणि गौरी मेकअप आर्ट च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी केंद्र प्रमुख मधुकर धनावडे,बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते एकनाथ ओंबळे,जावली बँक संचालक राजूशेठ ओंबळे,जावली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अभिजीत शिंगटे,शिक्षक बँकेचे गणपत धनावडे, अॅड . दत्ता धनावडे,युवा नेते दिपक कदम,शिवसेनेचे युवा नेते सचिन जवळ ,केडंबे ग्रामस्थ आनंदा ओंबळे, शांताराम ओंबळे, किरण कदम, भाजपाचे गणेश पारटे, भानुदास ओंबळे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी जावली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अभिजीत शिंगटे यांनी धनावडे कुटुंबियानी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांनी धनावडे परिवाराने व्यवसाय क्षेत्रात आपले कला कौशल्य दाखवून आपला व्यवसायांचे कार्यक्षेत्र वाढवावे असा सल्ला देत त्यांचे अभिनंदन केले.