सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
सर्जापुर ता. जावली येथिल शेतात अनोळखी इसमाच्या अकस्मात मृत्यूची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाल्यानंतर सदर इसमाची ओळख व्हाटस् अप द्वारे पटल्यावर नातेवाईकांनी खुनाचा आरोप केला असता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेढा पोलीस स्टेशन येथे दि. 15 रोजी सर्जापूर, ता. जावळी, जि. सातारा येथील एका शेतात अनोळखी इसमाचा मतदेह आढळल्याने त्याबाबत अकस्मात मयत रजिस्टर नंबर 20/2023 सीआरपीसी कलम 174 नुसार मयताची नोंद करण्यात आली होती. सदर अनोळखी इसमाबाबत हद्दीतील पोलीस पाटील यांचे व्हाट्सअप ग्रुपद्वारे तो वायरल केले असता त्या आधारे त्याची ओळख पटविण्यात आली.
सदर इसमाचे नाव किशोर श्याम निकम, वय 29, रा. रुईघर, ता. जावळी, जि. सातारा असे असल्याचे कळाले. त्यानंतर लागलीच त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. सदर इसमाच्या मृतदेहावर काही ठिकाणी मार लागल्याच्या खुणा दिसून आल्याने दि. 16 रोजी सदर मयत इसमाचे नातेवाईक यांनी किशोर शाम निकम याचे मृत्यू बाबत संशय व्यक्त करून, त्यास मारहाण झालेने त्याचा मृत्यू झाला असून त्याबाबत भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल होण्याबाबत कळविले. त्यानुसार मेढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 104/2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर करीत आहोत.