सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! विजय लकडे ! संत सोपानकाकांचा पालखी सोहळा निरेच्या स्वागतानंतर बारामती तालुक्यात प्रवेश करणार : आज निंबुत मुक्काम तर उद्या सोमेश्वरनगरला पाहिले गोल रिंगण

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम मांडकी येथे घेऊन जेऊर, पिंपरे (खुर्द) मार्गे नीरा शहरात विसावला. अहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. नीरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले. हा सोहळा आज निंबुत याठिकाणी मुक्कामासाठी विसावणार असून उद्या दुपारी 3 वाजता काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात या सोहळ्याचे पाहिले गोल रिंगण पार पडणार आहे.

       आज शनिवारी सकाळी पुरंदर तालुक्यातील बागायती गाव म्हणून ओळख असलेल्या मांडकी गावचा मुक्काम आटपून, जेऊर मार्गे पिंपरे (खुर्द) येथे सकाळच्या न्याहरीसाठी विसावला. जेऊर येथे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी सकाळी सातच्या सुमारास पालखीचे स्वागत केले. नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील शिवाजी चौकात पालखी रथाचे आगमन साडेअकराच्या सुमारास झाले. यावेळी कडक उन्हात चालत आलेले वारकरी शिणले होते. सोहळ्याच्या स्वागतासाठी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी सभापती बांधकाम आरोग्य दत्ताआबा चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सोमेश्वरचे संचालक जितेंद्र निगडे, गुळुंचेचे माजी सरपंच संतोष निगडे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, अनंता शिंद, संदिप धायगुडे, अनिल चव्हाण, अँड. मुकुंद ननवरे, बाळासाहेब ननवरे, कांचन निगडे, विजय शिंदे, राजेश चव्हाण, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, ग्रामसेवक मनोज डेरे यांनसह भाविक ग्रामस्थ उपस्थित होते.  

           आहिल्यादेवी होळकर चौकात रथातून  पालखी उत्साही भाविकांनी खांद्यावर घेऊन विठ्ठल मंदिरात ठेवली. दुपारच्या या विसाव्याच्या काळात परिसरातील नागरिकांनी रांगालावुन पालखीतील सोपानकाकांच्या पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. दरवर्षी सोपानकाकांच्या या पालखी सोहळ्यात दिंड्यांचे प्रमाण वाढते आहे. या वर्षी सोहळ्यात ६ दिंड्याची वाढ झाली असुन आता १०० दिंड्या सहभागी झालेल्या आहेत.  

          संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा विसावल्यानंतर सोहळ्यातील भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने विठ्ठल मंदिर सभागृहात अन्नदान करण्यात आले. दुपारी तीन वाजता पालखी सोहळ्याचे बारामती तालुक्यातील निंबुत येथील मुक्कामासाठी प्रस्थान होणार असल्याचे माहिती दिली चोपदार रणवरे यांनी दिली. 
-----------------
    "मागच्या सोहळ्यापेक्षा प्रत्येक दिंडित दिडपट समाज वाढलाय. शासनाने ठिकठिकाणी सावली केली आहे. शासनाने वाढिव चार टँकर, मेडिकल सुविधा जास्तीची ठेवली आहे. चार ॲम्बुलन्स आहेत. एक कार्डिया ॲम्बुलन्स ऑन कॉल ठेवली आहे. यावर्षी उन्हाचा त्रास होतोय पण वारी ही विठ्ठल नामाचा हरी नामात दंग होऊन चालत आहेत. वैश्णवांच्या उत्साहत कोणतीच कमी नाही, आनंद सोहळा आहे" 
अँड. त्रिगुण गोसावी 
मुख विश्वस्थ तथा सोहळा प्रमुख
श्री. संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, सासवड

COMMENTS

जाहिरात ..!

जाहिरात ..!
Name

Accident,1,blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7593,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,someshwar karkhana news,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,भोर विधानसभा,2,भोर विधानसभा News,1,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! विजय लकडे ! संत सोपानकाकांचा पालखी सोहळा निरेच्या स्वागतानंतर बारामती तालुक्यात प्रवेश करणार : आज निंबुत मुक्काम तर उद्या सोमेश्वरनगरला पाहिले गोल रिंगण
पुरंदर ! विजय लकडे ! संत सोपानकाकांचा पालखी सोहळा निरेच्या स्वागतानंतर बारामती तालुक्यात प्रवेश करणार : आज निंबुत मुक्काम तर उद्या सोमेश्वरनगरला पाहिले गोल रिंगण
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjx2p2Qgk6sqDiL2K_73RKPO2dbdOXG6_qDou_YkuLw35-L-CsaIUxN8Sup0Wadd5SAlOiY50xBPU3mAeMYOoUfAvo58Pkt7OPJy5vZAobG7hKcQt3iHmySQpyJD9HIg3SQ2iSmcczOvAygxWnv_UXhEwsOLH8qvoXQgGZrKz0J2BiEDuZVms23LDw1zg
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjx2p2Qgk6sqDiL2K_73RKPO2dbdOXG6_qDou_YkuLw35-L-CsaIUxN8Sup0Wadd5SAlOiY50xBPU3mAeMYOoUfAvo58Pkt7OPJy5vZAobG7hKcQt3iHmySQpyJD9HIg3SQ2iSmcczOvAygxWnv_UXhEwsOLH8qvoXQgGZrKz0J2BiEDuZVms23LDw1zg=s72-c
सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/06/blog-post_22.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/06/blog-post_22.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy