सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
आज संत सोपानकाका पालखी सोहळ्याने पुरंदर तालुक्याची हद्द सोडत बारामती तालुक्यात प्रवेश करत निंबुत या ठिकाणी मुक्कामासाठी पालखी सोहळा विसावला. उद्या दुपारी 3 वाजता सोमेश्वरनगर येथे काकडे महाविद्यालय मैदानावर पालखी सोहळ्याचे पाहिले अश्व रिंगण पार पडणार आहे.
पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम आटोपून निरे मधून दुपारी दोन वाजता मार्गस्थ झाला.
नींबूतच्या वेशीवर अलीकडे आनंदनगर व लक्ष्मीनगर येथील ग्रामस्थांनी मोठ्या भक्ती भावाने पादुकांचे दर्शन घेतले येथील युवकांनी वारकऱ्यांना केळी बिसलरी व बिस्कीटचे वाटप केले. त्यानंतर पाच वाजता नींबूतच्या वेशीवर शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे. सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे नींबूतच्या सरपंच निर्मला काळे उपसरपंच अमर काकडे. सोमेश्वर चे संचालक अभिजीत काकडे, गौतम काकडे उदय काकडे विजय काकडे नंदकुमार काकडे विस्तार अधिकारी खंडाळे ग्रामसेवक काळभोर यांनी मोठ्या भक्ती भावाने पालखीचे स्वागत केले.
पालखीचा आजचा मुक्काम नींबूत या ठिकाणी असून साहेबराव दादा सोसायटी. ग्रामविकास प्रतिष्ठान निंबूत ग्रामपंचायत निंबूत व ग्रामस्थ निंबूत यांच्यातर्फे सर्व सोयी सुविधा पुरविण्यात आले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र होळ चे आरोग्य कर्मचारी आरोग्य सुविधा पुरवत आहेत. हिंदी मुक्कामाची सोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबूत अस्मिता भवन पशुवैद्यकीय केंद्र निंबूत ग्रामपंचायत कार्यालय पेटी हॉल या ठिकाणी करण्यात आली आहे. साहेबराव दादा सोसायटीचे चेअरमन अजित काकडे व सर्व संचालक मंडळ यांच्यातर्फे केळी बिसलरी व खाऊचे वाटप करण्यात आले.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि, सचिन काळे, पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.