सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील पोलिसांचे गाव समजल्या जाणाऱ्या बालवडी ता.भोर येथील उच्चशिक्षित तरुण महेंद्र फणसे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली.फणसे यांचे भोर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
महेंद्र फणसे सध्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथे आदर्श पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून त्यांची २७ वर्ष शासकीय सेवा झाली असून नवीन विद्यार्थ्यांना पोलीस भरती होण्यासाठी आवश्यकते मार्गदर्शन फणसे यांच्याकडून केले जात आहे.तालुक्याच्या वीसगाव खोरे परिसरातील पोलीस दलात सेवेत रुजू असणाऱ्या जवानांकडून त्यांचे अभिनंदन करून पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तर त्यांची पोलीस दलातील पदोन्नती ही तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे.
COMMENTS