Medha news ! रुईघरच्या किशोर निकमचा खुनी चार तासात जेरबंद : मेढा पोलीसांची दमदार कामगिरी

Admin
2 minute read
मेढा : ओंकार साखरे
सर्जापुर ता. जावली येथिल शेतात दारुच्या धुंदीत झालेल्या मारहाणीत नातेवाईकांनी केलेल्या खुनाचा आरोपानंतर मेढा पोलीसांनी चार तासात खुनीचा शोध लावत वैभव रविंद्र बोराटे यास जेरबंद केले असून पोलीसांच्या कामगिरीवर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी शाबासकीची थाप दिली आहे. 
           याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेढा पोलीस स्टेशन येथे दि. १४ रोजी सर्जापूर, ता. जावळी, जि. सातारा येथील एका  शेतात दारु पिऊन वैभव व किशोर यांच्या मध्ये झालेल्या हाणामारीत किशोर निकम यांचा खुन झाला होता. त्याबाबत अकस्मात मयताची नोंद करण्यात आली होती.
              सदर मयत किशोर श्याम निकम, वय 29, रा. रुईघर, ता. जावळी याच्या खुनाचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचंद यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सहा.पो.नि. अश्विनी पाटील याच्या पथकामे कामगिरी करित चार तासात आरोपी वैभव रविद्र बोराटे वय २८ रा. सर्जापूर यास अटक केली. या तपासात अंमलदार सपोफौ गंगाव पो हवा. डी.जी. शिंदे, पोना. नंदु कचरे, पो.श . सनी काळे, दिगंबर माने, अभिजित वाघमळे, विजय माळी आणि बाळकृष्ण नष्टे यांनी सहकार्य केले.
To Top