सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
महात्मा गांधी विद्यालय नीरा येथे काका पाटील ज्ञानपीठ श्री महालक्ष्मी व हनुमान यात्रा मंडळ निरा यांच्या वतीने दिनांक चार व पाच जून रोजी दोन दिवसीय उन्हाळी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ता चव्हाण यांनी दिली.
या शिबिरामध्ये 15 ते 25 वयोगटातील युवकांसाठी व ज्येष्ठांसाठी योगा व्यायाम मैदानी खेळ कराटे स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळ स्पर्धा यासह विविध क्षेत्रातील ज्येष्ठ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व ज्येष्ठांच्या त्यानुसार त्यांची जडणघडण योग्य प्रकारे व्हावी हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य भीमराव बनसोडे यांचे कडून नैतिक मूल्याची आवश्यकता पीडीसी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे आजच्या तरुणा पुढील आव्हाने . सज्जनगडाचे व्यवस्थापक योगेश बुवा रामदासी यांच्या वतीने युवकांचे आव्हाने व संस्कार तर जेजुरीचे उद्योजक रामदास कुटे मनाला जिंका जग जिंका डॉक्टर संतोष जगताप आयुर्वेदिक आरोग्य याचबरोबर सातारच्या डीवायएसपी उज्वला वैद्य यांचे समाजाच्या प्रगतीतील युवकांचे स्थान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सकाळचे पत्रकार संतोष शेंडकर यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.
काका पाटील ज्ञानपीठ संस्थेतर्फे गेली सत्तावीस वर्षे निरा येथे व्याख्यानमाला आयोजित केली जाते
याचा समारोप फलटण जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर बारामती तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर तानाजी बरडे डी वाय एस पी भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री महालक्ष्मी व हनुमान तरुण मंडळ यांच्या वतीने करण्यात आले.
COMMENTS