सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे व भोर तालुका विधी समिती यांचे संयुक्त विदयमाने पिसावरे ता.भोर येथील माध्यमिक विदयालयामध्ये आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी तसेच पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये जेष्ठ विधीज्ञ ऍड.विठ्ठल दुधाणे यांनी आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनानिमीत्त बालमजूरी संदर्भातील कायदे तसेच पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पर्यावरण कायदे याविषयी विदयार्थ्यांना माहिती दिली.यावेळी मुख्याध्यापक सुभाष जाधव,उपशिक्षक पक्षीप्रेमी संतोष दळवी ,कोठावळे व संतोष धाेंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS