बारामती ! शाळेचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कोऱ्हाळे गावाने लावली होती सरपंच आणि सदस्यपदाची बोली...! १९७२ साली सरपंचपदाचा १३ हजाराला तर सदस्यपदाचा १ हजाराला लिलाव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
गावात हायस्कूलची इमारत नाही...भविष्यातील पिढीला गावातच शिक्षण मिळावे म्हणून १९७२ आख्य गाव एक झालं..आणि शाळेची इमारत पूर्ण करायची म्हणून गावाची निवडणूक बिनविरोध करायचे ठरके..मात्र हे करत असताना सरपंच आणि सदस्यपदाची बोली लावून त्यामधून मिळणाऱ्या पैशातून शाळेचे बांधकाम पूर्ण करायचे ठरले. बोली लागली..१९७२ साली सरपंचपद तब्बल १३ हजाराला तर सद्स्यपद १ हजाराला लिलाव बोलीत विकले गेले. तयावेळी तब्बल २७ हजार रुपये गोळा झाले. आणि त्यातून रयत शिक्षण संस्थेचे सिद्धेश्वर हायस्कुलच्या भूमिपूजनाचा शुभारंभ झाला.
         कोऱ्हाळे बु l ता. बारामती येथे प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार आयोजित केला होता यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनील भगत यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना गावाच्या १९७२ सालातील गावाची निवडणूक कशा प्रकारे झाली तो किस्सा सांगितला. १९७२ पूर्वी कोऱ्हाळे गावातील मुलांना वडगाव निंबाळकर, माळेगाव, फलटण ठिकाणी माध्यमिक शिक्षणासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र शिक्षणासाठी लांब जावे लागत असल्याने मुलींची गैरसोय होत होती. परिणामी मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या. त्यावेळी गावचे जेष्ठ एकत्र येत गावात माध्यमिक विद्यालय होवे यासाठी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायची आणि पदांची बोली लावायची. याला सर्व गावाने पाठिंबा दर्शविला. त्यावेळी सरपंचपदाला १ हजार, उपसरपंचपदाला ५०० रुपये  तर सदस्यपद १०० रुपयांची बोली ठेवण्यात आली. यामध्ये सरपंचपद १३ हजाराला, उपसरपंच ५ हजाराला तर सद्स्यपद १ हजार रुपयांना विकले गेले. यामधून तब्बल २७ हजार रुपयांची रक्कम जमा झाली. 
या जमा झालेल्या रकमेतून माध्यमिक शाळेच्या बांधकामाला सुरुवात झाली.
 तर कै. भाऊसो रावजी भगत यांनी नीरा-बारामती रस्त्यालगतचे २ एकर क्षेत्र शाळेच्या क्रीडांगणासाठी बक्षिसपत्र म्हणून लिहून दिले.
          यासाठी कै, रामचंद्र भगत, कै. धोंडिबा खोमणे, कै. साहेबराव धापटे, कै. नामदेवराव खोमणे, कै. विठ्ठलराव माळशिकारे, तेंव्हाचे ग्रामसेवक तुकाराम धापटे, कै. शंकरराव सावंत, कै. यशवंतराव थोपटे, कै, निवृत्ती मतकर, दत्तात्रय भगत या जेष्ठांनी पुढाकार घेतला होता. 
        आणि आता त्याच शाळेत शिक्षण घेवून आज गावातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत. 
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, व्हॉइस चेअरमन प्रणिता खोमणे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, युवा नेते रविराज तावरे, लालासाहेब माळशिकारे, विलास भगत, लालासाहेब नलवडे,सरपंच रवींद्र खोमणे, डी.एम खोमणे, डॉ.गायकवाड, उद्योगपती संजय निकम, डी.जी. माळशिकारे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. 

To Top