सोमेश्रर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी भागातील निगुडघर ते म्हसर शिर्के आवाड रस्त्याच्या कामासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामसडक योजनेअंतर्गत ३ कोटी ८२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भोर- वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते रविवार दि.११ करण्यात आले.
तालुक्याचा विकास हाच ध्यास मनी धरून आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यात विकास कामे सुरू आहेत.भूमिपूजप्रसंगी मा.सभापती बाळासाहेब थोपटे,मा.जि.प.सदस्य विठ्ठल आवाळे,सा.कार्यकर्ते अनिल सावले, राजगडचे संचालक सुभाष कोंढाळकर,भोर तालुका किसान काँग्रेसचे तालुकध्यक्ष संजय मळेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, व्हा.चेअरमन अतुल शेडगे,संचालक विजय शिरवले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक गायकवाड, सुरेश राजिवडे, सरपंच संतोष गोळे, एकनाथ म्हसुरकर,मंगला कंक, शंकर पारठे तसेच किसनराव कंक, विष्णू मळेकर यांचेसह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
COMMENTS