सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाल्हे : ओम भुजबळ
सद्यस्थितीत नियोजित वधू वरासह,दोन्ही कुटुंबातील सदस्य,मित्रपरिवाराला डी जे च्या दणदणाट,घोडा,नाचकाम,आतषबाजीत लग्न झाले पाहिजे अशी मानसिकता पहायला मिळते.पण वाल्हे येथील सधन शेतकरी असलेल्या सचिन भुजबळ यांची कन्या अपूर्वा व सासवड येथील नेमस्त केलेला वर,राजेंद्र इनामके यांचे चिरंजीव ओंकार यांनी आज ऐनवेळी साखरपूड्याच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा करण्याचा दोन्हीघरातील ज्येष्ठ व्यक्ती व उपस्थित नातेवाईक यांचेपूढे 'करण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यातून अल्पकाळात झालेल्या चर्चेतून सर्वांनीच ह्या विवाहाला संमति दर्शविली.त्यानंतर साखरपूड्याच्या तयारीतच वाल्हे येथील वाल्मीकी ऋषी संजीवन समाधी परिसरात साखरपूड्याच्या कार्यक्रमातच हा अनोखा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला.साखरपानाच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा ऐनवेळी निर्णय घेऊन होत असल्याचा बोलबाला होताच मोठ्या उत्साहाने अनेकांनी विवाह सोहळ्यास स्वयंस्फूर्तीने उपस्थिती दर्शवून नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद देत त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
यासंदर्भातील उभय पक्षात चर्चा होऊन विवाह समारंभासाठीचे नियोजन होऊन दोन्ही बाजूकडील पंच, नातेवाईकांच्या उपस्थितीत याद्यांचा कार्यक्रमही यापूर्वी पार पडला.त्यात विवाह सोहळा कसा करायचा याचे नियोजनही याद्यांमध्ये नमूद करण्यात आले व दोन्ही पक्ष विवाहसोहळ्यासाठी आर्थिक जूळणी करू लागले.दरम्यान वधू वरांनी होणारा खर्च हे सारे पाहिले व यातून होणारी आर्थिक उधळपट्टी थांबली पाहिजे या निष्कर्षाप्रत आले.आपापसात चर्चा करून दोन्ही पक्षाकडील पूढे साखरपानाच्या कार्यक्रमातच विवाहसोहळा उरकण्याचा मनोदय व्यक्त केला. लग्नाच्या निमित्ताने होणारा नाहक खर्च ,उधळपट्टी टाळता येईल यावर दोघांचे एकमत झाले.तातडीने वधू वरांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात लगेच उभयपक्षात चर्चा होऊन सर्वांचेच एकमत झाले.दरम्यान तातडीने विवाहसोहळ्याची तयारी करण्यासाठी वधू वराकडील नातेवाईकांची लगीनघाई सुरू झाली.दरम्यान साखरपानाच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा होत असल्याचे वृत्त सर्वत्र पोहोचले. उत्सुकतेपोटी निमंत्रणाशिवाय अनेक जणांनी उपस्थित राहून वधू वरासह उभय पक्षातील नातेवाईकांचे कौतुक करून शुभाशिर्वाद दिले.लग्नास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,प्रा.डाॕ. दिगंबर दूर्गाडे,भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन नामदेव बारवकर,वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले,उपसरपंच सूर्यकांत भुजबळ,वाल्मीकी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मदन भुजबळ, यांसह अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून वधूवरासह उभय पक्षातील सदस्यांचे कौतुक केले.वधू वरांना शुभाशिर्वाद देताना डाॕ.दुर्गाडे म्हणाले,की सद्यस्थितीत लग्नसोहळा हा खर्चिक होत आहे.त्यासाठी कर्ज काढणे,वेळप्रसंगी शेत विकणे,गहाण ठेवणे असे प्रकार करत विवाह सोहळे केले जात आहेत.त्यातून दोन्ही कुटुंबाला आर्थिक झळ कित्येक वर्ष सोसावी लागते.या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भुजबळ व इनामके कुटुंबानी व वधूवरांनी समाजापूढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.पैशाची उधळपट्टी झाली नाही.इतरांनी हा आदर्श डोळ्यापूढे ठेऊन असे विवाह सोहळे पार पडले पाहिजेत ही बदलत्या काळाची गरज आहे.ह्या विवाह सोहळ्याने एक चांगला संदेश समाजापर्यंत जाणार आहे.श्री.बारवकर यांनी ह्या विवाह सोहळ्याचे समाजाची मानसिकता बदलण्यास प्रेरीत करणारा हा विवाह सोहळा ठरणार आहे. आज वाल्हे पंचक्रोशीत सर्वत्र ह्या विवाह सोहळ्याची चर्चा होत असून वधूवरासह ऊभयपक्षाचे कौतुकही होत आहे.
COMMENTS