सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामतीच्या ‘मोरगाव’ येथे गुप्तधनाच्या शोधासाठी काही मांत्रिक जादूटोणा व पूजा विधि करत असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गेली अनेक वर्ष बंद असलेल्या घरात परस्पर मोठ-मोठे खड्डे खोदल्याने स्थानिक रहिवासी यांच्यात भीतीचे सावट आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.
मोरगाव नजीक घवळ वस्ती येथील हा प्रकार आज समोर आलाय. काही अज्ञात लोकांनी गुप्तधन मिळवण्यासाठी रात्रीच्या अंधारात येथे पूजा विधि केल्याच्या खुणा या परिसरात आढळून आले आहेत.गेली दहा वर्षापूर्वीराहत असलेली अनेक घर अशाच भीतीने वापराविना पडून आहेत. येथे पूर्वजांचे गुप्तधन आहे असा काही मांत्रिकांचा संशय आहे. यातूनच रात्री अपरात्री येथील घरात खड्डे खोदल्याचे पाहायला मिळते.
येथील सुमारे 50 कुटुंब सध्या येथे राहत नाहीत. राहते घर सोडून अन्य ठिकाणी शेतात नवीन घर उभारली आहेत. या ठिकाणी शेतात कामासाठी जाणाऱ्या महिला व काही शेतकरी या अघोऱ्या पूजा विधि केल्याची पाहून भीतीच्या सावटाखाली आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आलीय.
याबाबत आज स्थानिक युवक प्रमोद लक्ष्मण तावरे सह पोपट तावरे यांनी माध्यमांसमोर ही माहिती दिली.
यांत्रिक मशीनच्या साह्यानेअज्ञातांनी खड्डा खोदून बुजवला
....................................
खड्ड्यात नेमके पुरलय तरी काय ?
येथील घटनास्थळावर शेतात साधारण पंधरा ते वीस फूट आकाराचा एक खड्डा खोदून तो बुजवल्याच्या असल्याची एक खुण शेतकऱ्यांनी दाखवली. धार्मिक भीतीपोटी या खड्ड्यात नेमकं काय ? आहे याचा शोध घेणे टाळण्यात आले.
यावरच दोन ठिकाणी पणत्या लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. खुदलेल्या खड्ड्यात नेमकं काय ? हा प्रश्न आणि उत्तरीत राहिला. या प्रकाराची वस्तुस्थिती पाहण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे वतीने एक पथक उद्या घटनास्थळी जाणार असल्याचे सांगण्यात आले.
नरबळी सारख्या विकृती टाळण्यासाठी प्रशासनाने दखल घेणे आवश्यक
गुप्तधनाच्या हव्यासापोटी ग्रामीण भागात देव देवऋषी अशा वृत्तीची काही समाजकंटक हिंसक कृत्य करतात. मात्र; वेळीच याची दखल घेतली. यापुढील अनर्थ टाळणे सहज शक्य होईल. गतवर्षी इंदापूर तालुक्यात असंच एक पोलिसात गुन्हा दाखल आहे परंतु योग्य तपासाभावी हे प्रकरण दुर्लक्षित पडून राहिले. यामुळे या घटनेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे
COMMENTS