पुरंदर ! विजय लकडे ! सासवड आगार प्रमुख... सकाळची पावणे सहाची एसटी बंद करून निरेकरांवर सूड उगवत आहेत का?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
रेल्वेने पहाटे पुणे मुंबईला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस आणि पहाटे पुण्याला जाणारी पॅसेंजर गाडी बंद करून निरा गावावर कुरघोडी केलेली असतानाच यामध्ये निरेकरांवर अन्याय करण्यात महामंडळाची एस. टी. ही आता मागे राहिलेली नाही.
          पहाटेच्या रेल्वे बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरवर्ग, व्यापारी, शेतकरी, वकील वर्ग, ससून येथे उपचाराला जाणारे रुग्ण आणि पुणे येथे लवकर जाऊन पुढे मुंबईला जाणारे प्रवासी या सर्वांना निरा येथून लवकर पुण्याला जाण्यासाठी आधार होता तो सकाळी ५:४५ ला असणाऱ्या निरा- स्वारगेट या एस. टी. बसचा परंतु ही एस. टी. बस बंद करून सासवड डेपो ने निरेकरांवर एक प्रकारे अन्याय  केलेला आहे. या एस.टी. बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही ही  एस. टी. बस बंद करण्यामागे सासवड आगार प्रमुख निरेकरl वर सूड उगवत आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
        हडपसर ते निरा पी. एम. पी. एल. बस चालू असताना प्रवासी समाधानी होते. परंतु पी.एम. पी. एल. बस बाबत एस .टी. महामंडळाने एस. टी. बस सेवेवर हडपसर ते निरा या मार्गावर परिणाम होत असलेने तक्रार करून पी.एम.पी.एल. बस सेवा बंद करायला लावली. त्यावेळेस मात्र एस.टी. महामंडळाने सिटी बस प्रमाणे सुरळीत शटल बस  सेवा देण्याचे आश्वासन दिलेले होते. हे आश्वासन आता  हवेत विरल्याची जाणीव होऊ लागली आहे.
      तरी सकाळी ०५:४५ ला असणारी निरा- स्वारगेट ही बंद झालेली एस. टी. बस पूर्ववत सुरू करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा निरा प्रवासी संघाचे टी.के. जगताप, पी. एल. निगडे, सुधीर पोपटलाल शहा आणि सचिन मोरे यांनी दिला.
To Top