सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
दुर्गम डोंगरी भोर विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभाल करणे कामांसाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ९ कोटी २१ लक्ष निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार थोपटे यांनी दिली.
भोर -वेल्हा- मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून बहुतांशी विकास कामे झाली आहेत तर उर्वरित विकास कामांसाठी भरिव निधी मिळविला जात आहे.सद्या निधी उपलब्ध झालेली कामे खालील प्रमाणे रा.म.४५ किकवी ते सावरदरे ३५३.५० लक्ष, रा.म.१०६ कुरुंगवाडी ता.भोर १४१.६८ लक्ष, रा.म.११५ ते आंबेगाव भिलारवाडी ता.मुळशी २१७.२२ लक्ष, प्रजिमा १३२ ते कातरटवस्ती ता. मुळशी २०९.२५ लक्ष.इ. रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याने वाहतूक व दळण वळणाचा मार्ग सुकर होणार आहे.