सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
स्पर्धेला आपली मुले कशी तयार होतील याची काळजी सर्वच पालकांना लागली आहे.स्पर्धा असल्यामुळे सर्व क्षेञात आपला मुलगा , मुलगी सर्वोत्तम व तरबेज असावीत असेही विचार पालकांमध्ये येतात.पालक ,विद्यार्थी, शिक्षक बदलल्याने चांगल्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. टीव्ही , मोबाईल शिवाय आपल्याला जीवन जगता येते . आनंदी जीवन जगण्याकरिता संस्कार शिबीराची गरज असल्याचे प्रतिपादन सातारा जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांनी नीरा येथे केले.
नीरा येथे काका पाटील ज्ञानपीठ , श्री.महालक्ष्मी व हनुमान याञा मंडळ यांच्या वतीने ४ व ५ जुन या दरम्यान दोन दिवसीय संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबीराच्या समारोपप्रसंगी संजीवराजे निंबाळकर बोलत होते.
संस्कार शिबीराचा शुभारंभ माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या हस्ते सरस्वती पुजनाने करण्यात आला. या दिवशी माजी मुख्याध्यापक भिमराव बनसोडे यांनी नैतिक मुल्यांची आवश्यकता , जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी आजच्या तरूणांना पुढील आव्हाणे , सज्जनगडचे व्यवस्थापक योगेशबुवा रामदासी यांनी युवकांपुढील आव्हाने व संस्कार, जेजुरीचे उद्योजक डॉ.रामचंद्र कुटे यांनी मनाला जिंका, जग जिंका या विषयावर व्याख्यान दिले.
सोमवारी ( दि.५) सकाळी योगा सुर्यनमस्कार, प्रार्थना डॉ.संतोष जगताप यांचे आयुर्वेद व आरोग्य या विषयावरील व्याख्यान, पञकार संतोष शेंडकर , कराटे किक बॉक्सिंगचे संजय सोनवणे, जाधव क्लासेसचे मुकुंद जाधव, हिम्मतसिंह चव्हाण यांनी शिबीरार्थीशी गटचर्चा करून मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमा प्रसंगी लक्ष्मणराव चव्हाण, जितेंद्र निगडे, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, माणिकराव म्हस्के, डॉ.श्रेणीक शहा, मुनीर डांगे, सुनिल चव्हाण, अल्ताफ सय्यद, शरद जगदाळे, प्राचार्य विजयकुमार भोसले, बिपिन मोहिते, नितीन जगताप, तनुजा शहा, नेहा शहा, वैजयंती शहा यांच्यासह शिबिरार्थी विद्यार्थी , ग्रामस्थ उपस्थित होते. सुमारे १०० मुलांनी शिबीरामध्ये सहभाग घेतला होता. शिबीरार्थांना संजिवराजे निंबाळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपञ देण्यात आले.
समाजातील नविन पिढीतील सहनशीलता संपलेली आहे.विचार करण्याची दिशा बदललेली आहे. समाजातील विचारवंतांनी मार्गदर्शन करावे . आयुष्यभराची विचाराची शिदोरी देऊन तरूण पिढीला जगण्याचे बळ मिळावं म्हणून संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे
प्रास्ताविकात दत्ताजीराव चव्हाण यांनी सांगितले.
सुञसंचालन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले तर आभार संजय सोनवणे यांनी मानले.
--------------------------------------------------------------
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्तिती केली पाहिजे - डीवायएसपी उज्वला वैद्य
समाजाच्या प्रगतीत युवकांचे स्थान या विषयावर बोलताना सातारच्या अँन्टी करप्शनच्या डीवायएसपी उज्वला वैद्य म्हणाल्या की, पुर्वी एकञ कुटूंब पद्धतीत संस्कार मिळत असायचे. परंतू विभक्त कुटूंबपद्धतीत मुलांवर पाहिजे तेवढे संस्कार होत नाही. यासाठी संस्कार शिबीराची आवश्यकता आहे. मोबाईलवरील गुगलवर अभ्यासाच्या गोष्टी समजू शकतात. आयुष्यात कोणत्याही क्षेञात यश मिळवायचे असेल तर त्याला पहिले स्वतःला काय आवडते ते ठरविले पाहिजे. त्यानंतर त्याची ध्येय निश्चिती केली पाहिजे. त्यानंतर ध्येयाचा मार्ग शोधला पाहिजे.
--------------------------------------------------------------