बारामती ! रेप्टोक्रॉस ब्रेट कंपनीची ३१८ एकरात एनए....ग्रामपंचायतला महसूल मात्र चार खोल्यांचाच

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
रेप्टोक्रॉस ब्रेट कंपनीने गडदरवाडीच्या माळरानावर २०११ साली कंपनीसाठी जागा हेरली.. ग्रामपंचयात व गावकऱ्यांना विश्वास संपादन करत २०११ साली याठिकाणी काही खोल्यांचे बांधकाम सुरू केले. महावितरण व इतर परवानग्यासाठीच्या ना हरकत दाखल्यासाठी कंपनीने २०११ ला गडदरवाडी ग्रामपंचयातकडे काही 
खोल्यांची नोंद केली. सद्या कंपनी ग्रामपंचयात ला २०११ साली केलेल्या नोंदीवर वर्षाला अवघा ३ हजार ९२२ रुपये महसूल भरत आहे. त्यानंतर मागील १२ वर्षात कंपनीने या बांधकामात वाढ केली असून तब्बल ३१८ एकर जागा एनए (बिगर शेती) केली आहे. 
              शासकीय नियमानुसार एनए जागेला प्रतिस्क्वेअर फुटाला १० पैसे ते १ रुपयांपर्यंत आकार आकाराला जातो. मात्र कंपनीने नवीन बांधकामाची तसेच एनए जागेची गडदरवाडी ग्रामपंचयातकडे नोंदच केली नसल्यामुळे आतापर्यंत ग्रामपंचायतचा करोडो रुपयांचा महसूल या कंपनीने बुडवला असल्याची बाब उघड झाली आहे. ग्रामपंचायतने देखील वेळोवेळी पत्रव्यवहार करून नवीन बांधकाम व एनए जागेची नोंद करण्याबाबत कंपनीला कळविले आहे. मात्र आजतागायत कंपनीने ग्रामपंचयातच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. याबाबत २० जून २०२३ रोजी ग्रामपंचायतने कंपनीला मिळकत होणेबाबत पत्र पाठवले असून या पत्रात म्हणटले आहे की, आपणास कळविण्यात येते कि मौजे गडदरवाडी येथे आपली रॅप्टाकाँस ब्रेट & कंपनीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करावी. त्यासाठी आवश्यक असणारी कंपनीचे ७/१२ एनएचा उतारा, इमारतीचे बांधकाम झालेली कागदपत्रे ग्रामपंचायत दप्तरी सादर करावीत अन्यथा भोगवटा सदरी नोंद करून आपल्या मिळकतीची कर आकारणी आपणास कळविण्यात येईल तरी ८ दिवसात कंपनीने कागदपत्रे ग्रामपंचायतीस सादर करावी असे ग्रामपंचायतने कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हणटले आहे.
--------------------------
 रेप्टोक्रॉस ब्रेट ही कंपनीची सद्या ३१८ एकर एनए जागा असून शासकीय नियमानुसार कंपनीकडून स्क्वेअर फुटाला ५० पैसे जरी महसूल आला तरी वर्षाला ७० लाख रुपये महसूल येणे अपेक्षित आहे.मात्र कंपनीकडून ग्रामपंचायतला वर्षाकाठी अवघा ४ हजार रुपयांच्या आसपास महसूल मिळत आहे. 
मालन गडदरे : सरपंच
गडदरवाडी
To Top