बारामती ! बँड...बाजा ..आणि फुलांची पुष्पवृष्टी...! सोमेश्वरनगर परिसरातील शाळांमधून पाचवीतील मुलांचा वाजत गाजत प्रवेशोत्सव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे सव्वाशे पाचवीतील विद्यार्थ्यांचा वाजतगाजत प्रवेशोत्सव करण्यात आला. मुलांना गुलाबपुष्प व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
           सोमेश्वर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांना वाजतगाजत शाळेत प्रवेश कऱण्यात आला. यानंतर सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे, पत्रकार संतोष शेंडकर, महेश जगताप व युवराज खोमणे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक बाळासाहेब मिंड, युवराज शिंदे, दिलीप वाडकर, पी. बी. जगताप, मिलिंद कांबळे, प्रमोद वायाळ यांच्यासह अनेक पालकही उपस्थित होते. सुजाता जगताप यांनी मुलांसाठी स्वागतगीत सादर केले. दरम्यान, सोरटेवाडी माध्यमिक विद्यालयात प्रवेशव्दारापासूनच बँडपथकाच्या तालावर पंचावन्न मुलांचा प्रवेश करण्यात आला. पुष्पवृष्टी करत या मुलांना व्यासपीठावर आणण्यात आले. पालकांसह मुलांचा गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन मुख्याध्यापक संजय लकडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. बाबुलाल पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. वाणेवाडीचे न्यू इंग्लिश स्कूल व भागशाळा मुरूम यांच्या वतीने ८५ नवागत मुलांचे गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापक संजय कांबळे यांच्या हस्ते स्वागत झाले. मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळेत पहिली ते नववीपर्यंतच्या शंभर मुलांचा प्रवेश संपन्न झाला. प्रवेशव्दारापासूनच बॅडच्या तालावर वाजतगाजत मुलांना आणण्यात आले. विधानपरिषदेचे माजी आमदार अॅड. विजयराव मोरे मुलांचे स्वागत केले. याप्रसंगी हनुमंत बालगुडे, राजेंद्र मोरे, विश्वनाथ टेंगले,, सुलोचना बनकर, योगेश मोरे, बंडू मोटे उपस्थित होते. 
--
To Top