भोर ! संतोष म्हस्के ! जिल्हा बँकेच्या शाखा प्रमुखाचा प्रामाणिकपणा : आठवडे बाजारात हरवलेले सोन्याचे मंगळसूत्र केले परत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी 
भोरच्या मंगळवार दि.१३ आठवडे बाजारात गर्दीच्या रस्त्यावर एका महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडले होते.हे सोन्याचे मंगळसूत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर लक्ष्मन गिरे यांनी माणुसकीचे दर्शन दाखवीत पोलिसात जमा करून ओळख पटवून खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील महिला सुमन संपत कचरे यांना परत केले.                   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोर शहरातील चौपाटी येथील पिडीसीसी बँकेच्या समोरील रस्त्यावर आठवडे बाजारादिवशी एक मंगळसूत्र रस्त्यावर तुटून पडले होते.हे मंगळसूत्र बाजारात ये -जा करणाऱ्या दोन महिलांना मिळून आले होते.दोन्ही महिलांनी बँकचे मॅनेजर यांच्याकडे सापडलेले मंगळसूत्र दिले.तात्काळ बँक मॅनेजर यांनी पोलिसांशी संपर्क साधून मंगळसूत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. हे मंगळसूत्र बाजारातील व्यापारी सुमन कचरे यांचे असल्याचे खात्रीशीर पटवून पोलिसांनी परत केले.सदर महिलेने आनंदित होऊन बँक मॅनेजर  व भोर पोलिसांचे आभार मानले.यावेळी भोर पोलीस स्टेशनचे मा.परी पोलीस उपअधीक्षक रेखा वाणी यांनी नागरिकांना आवाहन केले की नागरिकांच्या वस्तू ,दागिने, मोबाईल, दस्तऐवज, कागदपत्र अशा गहाळ झालेल्या हरवलेल्या वस्तू मिळून आल्यास प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनला जमा कराव्यात जेणेकरून त्या वस्तू संबंधितांना परत दिल्या जातील व त्यांचे समाधान होईल.
To Top