सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलजी या महाविद्यालयासह राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परीषद (नॅक) समितीने २२ व २३ मे ला भेट दिलेली होती. समितीने महाविद्यालयास "बी" मुल्यांकन दिलेले असून ही बाब व्यवस्थापन, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच प्रमाणे परीसरातील सर्व उस उत्पादक सभासदांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीताची कॅप प्रवेश प्रक्रिया ही गुरुवार( दि.१५) पासून सुरू होत आहे. प्रवेशित विद्यार्थ्याकरीता महाविद्यालयामध्ये कँपजेमिनी ही मल्टीनॅशनल कंपनी ३०० तासाचे विनाशुल्क प्रशिक्षण देणार असून कंपनी मार्फत विद्यार्थ्यांची त्यांच कंपनीत निवड करण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये एक आंतरराष्ट्रीय स्तरावर पेंटट ग्रेन्ट झालेले आहे. तसेच इतर ४ राष्ट्रीय स्तरावर पेटंट हे प्रकाशित झालेले आहे. महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब आहे. मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी नामदेव भगवान ठोंबरे या विद्यार्थ्याचे "आधुनिक खुरपणी, कोळपणी व खत पेरणी यंत्र या प्रकल्पाची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित "राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धे साठी" साठी झाली होती यामध्ये त्याला तिसरा क्रमांक मिळाला आहे. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर विभागातील विशाल पानसरे व त्यांच्या सहका-यांचा 'ब्लड बैंक (रक्तपेढीची उपलब्धता रिअल टाईम नेव्हीगेशन प्रणाली) या प्रकल्पाची निवड ही आयआयटी कानपूर या ठिकाणी झालेली होती. विद्यार्थ्यामधील सर्जनशीलतेला वाव मिळावा तसेच संशोधनाला चालना मिळावी, या उद्देशाने व्यवस्थापन, प्राचार्य व महाविद्यालय नेहमीच तत्पर असते.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीन वाढीसाठी व विकासासाठी महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता डेटा सायन्स आणि मशिन लर्निंग हा १०० तासांचा कोर्स विनाशुल्क सुरू केलेला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये मिळालेल्या या भरघोस यशाबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप ,उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, सचिव भारत खोमणे, सर्व संचालक मंडळ, सभासद यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
...............