सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे,हिर्डोस मावळ खोऱ्यातील रायरेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भोर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण तसेच विनापुजन राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या हस्ते करून हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
कै.माजी आमदार संपतराव जेधे यांनी सुरू केलेल्या रायरेश्वर पायी दिंडी सोहळा ४५ वर्षांपासून अखंडपणे सुरू असून आंबवडे खोरे,हिर्डोस मावळ तसेच भोर तालुक्यातील विविध ठिकाणचे वारकरी दरवर्षी पंढरपूरपर्यंत पायी वारी करतात.भोर येथील वनवासी कल्याण आश्रमातील मुक्काम आटोपून गुरुवार दि.१५ सकाळी भोर शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.भोरमधून वारकरी मोठचा प्रमाणात वारीत सहभागी झाले असून आमदार संग्राम थोपटे यांच्या सुविद्य पत्नी स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते चौपाटी येथे वारकऱ्यांना प्रत्येकी एक ब्लॅंकेट तसेच अल्पोपहार वाटप करण्यात आले.तर चौपाटी येथील विजय गोळे यांच्याकडून वारकऱ्यांना नास्ता देण्यात आला.यावेळी ह.भ.प.नामदेव महाराज किंद्रे, बाळासाहेब सोनवणे, रामदास जेधे,प्रदीप शिनगारे, रामदास जेधे, नितीन जेधे,विजय धुमाळ, ह.भ.प. बापू कंक,पंढरीनाथ भिलारे,प्रवीण शिदे,माजी जिल्हा परिषद सदस्या गीतांजली आंबवले,गीतांजली शेटे,राजेंद्र शेटे,दादा थोपटे, डॉ.प्रदीप पाटील,सुवर्णा मळेकर,उपनगराध्यक्ष समीर सागळे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर,गणेश पवार,आणि वारकरी सहभागी झाले.
COMMENTS