सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
निंबुत (बारामती) येथील ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्री बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. विद्यालयाच्या निंबुत (बारामती) पिंपरे खुर्द. (पुरंदर) येथील विद्यालयांची सुमारे वीस वर्षापासून दहावीचा शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा शाळेने कायम राखली आहे.
निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील अपेक्षित वंचित समाजातील घटकांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने २१ जून १९९९ रोजी निंबुत (बारामती ) येथे बाबालाल साहेबराव काकडे देशमुख या विद्यालयाची स्थापना केली. तर ३१ ऑगस्ट २००० रोजी पिंपरे खुर्द येथे बाबालाल साहेबराव काकडे देशमुख या दुसऱ्या विद्यालयाची स्थापना केली. निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित या विद्यालयाचा गेल्या वीस वर्षांपासून दहावीचा निकाल १००% लागण्याची उज्वल परंपरा आहे. .
यामध्ये निंबुत विद्यालयाला २००७ साली १०० टक्के अनुदान आले. तर पिंपरे विद्यालयाला २००९ साली १०० टक्के अनुदान आले ,हे अनुदान फक्त शिक्षक पगाराचे होते. त्या अगोदर शाळेचा सर्व खर्च व विद्यार्थी खर्च गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर व शिक्षक पगार हा निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान मार्फत केला जात होता. आजही शिक्षक वेतन खर्च सोडून विद्यालयाचा सर्व खर्च निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष सतीश काकडे हे स्वतः करतात.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे ते मुंबई मोफत विमान प्रवास घडवला जातो. विद्यालयातील शिक्षकांची निवड मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय येथील तज्ञ प्राध्यापकाकडून केली जाते. यामुळे विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा खूप उंचावलेला आहे. शाळेच्या भव्य इमारतीच्या बांधकामात सुरुवात झालेली आहे. या विद्यालयात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी एक तर उच्च शिक्षण घेत आहेत, व उच्च पदावर कार्यरत आहेत. शाळेतील शिक्षकही हे अनुदान नसतानाही आणि सध्याही विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपलीच मुले समजून माता व पित्याची भूमिका घेऊन ज्ञान आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन चांगली वागणूक देत आहेत. यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये आदर भावना व आपुलकी निर्माण होऊन याचा गुणवत्तेवर चांगला परिणाम होत आहे.
COMMENTS