सोमेश्वर रिपोर्टर टीम---
नीरा : विजय लकडे
बारामती तालुक्यातील गरदडवाडी येथील रॅप्टोक्रॉस ब्रेट कंपनी गेल्या वीस वर्षांपूर्वी घोड्यांच्या मलमूत्रापासून औषधे तयार करण्यासाठी गरदडवाडी येथे सुमारे दोनशेपेक्षा अधिक एकरात स्थापन झाली आहे. मात्र सद्या स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून कमी करणे ग्रामपंचायत प्रशासनाचे कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करणे, मोठमोठी शेततळी निर्माण करून अवैधरित्या उत्खनन करणे, कंपनी लगत असणाऱ्या शेतातून मोठमोठे चर खोदून पाईपलाईन करणे, ग्रामपंचायत महसूल न देणे याबाबत गडदरवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
कंपनी स्थापनेवेळी कंपनीने ग्रामपंचायत गरदडवाडी व ग्रामस्थ गरदडवाडी यांना विश्वासात घेऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. मात्र आता कंपनीची सर्व आश्वासने हवेत विरली आहेत. थोड्याच कालावधीनंतर स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून कमी करणे ग्रामपंचायत प्रशासनाचे कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे करणे, मोठमोठी शेततळी निर्माण करून अवैधरित्या उत्खनन करणे, कंपनी लगत असणाऱ्या शेतातून मोठमोठे चर खोदून पाईपलाईन करणे, यामुळे ग्रामस्थांमध्ये कंपनी विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. कंपनी लगतच्या ओढ्यामध्ये केलेल्या पाईप लाईनमुळे पूर्ण ओढाच बुजला गेला असून, त्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी ओढ्यात न येता लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या सर्व कारभाराचा ग्रामपंचायत गरदडवाडीने कंपनीचे पत्र व्यवहार देखील केला असून यावर कंपनी प्रशासन कोणतीच हालचाल करताना दिसून येत आहे. कंपनी चालू झाल्यानंतर स्थानिक १२० भूमिपुत्र कामगार होते मात्र आता काही ठराविक कामगार तटपुंजा पगारावर तिथे काम करत आहेत. २०१३ पासून कंपनी ग्रामपंचायत कर भरण्यासाठी बंधनकारक असून सुद्धा कंपनीने कोणताही कर ग्रामपंचायतीकडे जमा केला नाही. कंपनीने काही ठिकाणी वनविभाग व शेतकऱ्यांच्या जमिनीवर ती अतिक्रमण देखिल केलेले आहे. कंपनीच्या या दंडेलशाही विरोधात ग्रामपंचायत गरदडवाडी व ग्रामस्थ यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.