बारामती ! ओढ विठ्ठलाच्या दर्शनाची..l ओढ विठ्ठल भेटीची..l विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आषाढीवारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पंढरपूरच्या वाटेवरील सर्व पालक या विठुरायाच्या दिशेने अग्रेसर होत असताना व विटूच्या भेटीला उत्कंठा वाढत असतानाच विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी अनुभवली शाळेतील आनंदवारी.
                यावेळी मुलांनी आपल्या खांद्यावरून पालखी घेतली. तसेच उभे रिंगण, फुगडी यासारख्या विसाव्या दरम्यान होणाऱ्या विविध खेळांचा अनुभव घेतला. शाळेतील स्वरांधरा संगीत मंचाने पारंपरिक भक्तीगीते गाऊन वातावरण अधिक भक्तीमय केले.  मुलांनी हातामध्ये विविध पर्यावरणाविषयी संदेश देणारे फलक घेऊन सामाजिक जागृती केली. सर्व पूर्व प्राथमिक विभागातील मुलांना पालखी सोहळ्यानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व पूर्व प्राथमिक विभागाचे शिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचीन पाठक उपस्थित होते.
To Top