सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील पांगारी-वेळवंड खोरे परिसरात अवैद्य धंदे फोफावले असून परिसरातील कोंडगाव ,साळुंगण ,सांगवी, नानावळे जयतपाड, डेहेन गावांमधील तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे.परिणामी अनेकांचे घर संसार मद्यपींमुळे उघड्यावर आल्याचे चित्र आहे.मात्र याकडे पोलिसांचे जाणून बुजन दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील महिला तसेच बुजुर्ग नागरिकांकडून प्रशासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त आहे.
पांगारी - वेळवंड परिसरात अनेक दिवसांपासून अवैध धंदे सुरू असल्याने अनेक बेरोजगार तरुण व्यसनाधीन झाले आहेत.या पार्श्वभूमीवर परिसरातील महिला तसेच बुजुर्ग व्यक्तींनी अवैद्य धंदे बंद व्हावे त यासाठी पालकमंत्री, आणि विरोधी पक्ष नेते, राज्य उत्पादन शुल्क पुणे- सासवड, अधीक्षक पुणे ग्रामीण,उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक भोर यांना लेखी तक्रार करूनही अवैद्य धंद्यांवर कारवाई होत नाही तर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.तर आम्ही नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.