फलटण ! गणेश पवार ! नीरा उजवा कालवा अस्तरीकरण विरोधात १५० हुन अधिक ट्रॅक्टरसह बळीराजा रस्त्यावर : साखरवाडी, सुरवडी, तडवळे, मुरूमसह आठ गावात कडकडीत बंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
साखरवाडी : गणेश पवार
नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला होत असलेला विरोध अधिक तीव्र झाला असून  मंगळवारी दि 18 रोजी फलटण तालुक्यातील सुमारे 22 गावातील शेतकरी व नागरिकांनी फलटण येथील जलसंपदा कार्यालयावर हजारोंच्या संख्येने शेकडो ट्रॅक्टर मधून मोर्चा काढला होता यावेळी या मोर्चामध्ये महिला व अबाल वृद्धांची संख्या लक्षणीय होती 

जलसंपदा विभागाकडून फलटण तालुक्यामध्ये तडवळे बंगला ते रावडी या चार किमीचे  सिमेंट काँक्रीट मध्ये अस्तरीकरणाचे काम मागील काही दिवसांपूर्वी सुरू केले आहे मात्र या कामामुळे कालव्या लगत असणाऱ्या विहिरी व कुपनलिका, बोअरवेल बंद पडण्याच्या भीतीने या कामाला तालुक्यातील  तडवळे, सुरवडी, मुरूम, रावडी बुद्रुक, रावडी खुर्द, खामगाव, होळ, डोंबाळवाडी, कुसुर,पाडेगाव, खराडेवाडी, निंभोरे, वडजल, भिलकटी , चौधरवाडी, साखरवाडी, सासवड, पाडेगाव, निंभोरे, तरडगाव, काळज, घडगेमळा या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये  ठराव करून विरोध केला आहे. 
             आज फलटण येथे या  गावातील हजारो शेतकरी,महिला व नागरिकानीं शेकडो ट्रॅक्टर मधून मोर्चा काढला होता यावेळी फलटण लोणंद या पालखी  मार्गावर सुमारे चार किलोमीटर मोर्चात सहभागी ट्रॅक्टरची रांग लागली होती मोर्चातील ट्रॅक्टर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे दाखल झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पायी मोर्चाची सुरुवात करण्यात आली पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा,क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मोर्चा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास प्रांत कार्यालय येथे दाखल झाला यावेळी मोर्चातील महिला व शेतकरी यांनी 'अस्तरीकरण हटाव शेतकरी बचाव',जल है तो कल है,शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी  परिसर दणाणून सोडला होता मोर्चातील सहभागी महिलांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व उपविभागीय अधिकारी  पाटबंधारे विभाग फलटणचे मिलिंद सपकाळ यांना  निवेदन देऊन कोणत्याही परिस्थितीत हे काम करू नये अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी या मोर्चामध्ये फलटण तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व फलटण शहर चे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्याने मोर्चा सुरळीत पार पडला
To Top