सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली असल्याने भोर चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिंदू जनजागृती समिती व हिंदूनिष्ठ संघटनांनी आंदोलन छेडले.
एका मोठ्या षड्यंत्राद्वारे देशभरातील भूमी हडपण्याचा अतिशय गंभीर प्रकार वक्फ कायद्याच्या माध्यमातून चालू आहे. याद्वारे हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि हिंदूंची मंदिरेही सुरक्षित नाहीत.त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रहित करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार दिं.१६ आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पराग गोखले, ह.भ.प. उमेश महाराज शिंदे,बाळासाहेब जाधव, तानाजी मालुसरे, कुणाल मालुसरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.तर यावेळी समीर घोडेकर,सचिन देशमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण प्रकरणाविषयी केंद्रीय स्तरावर तपास करून ‘वक्फ बोर्डा’ची संपूर्ण चौकशी व्हावी तर बेकायदेशीरपणे लाटलेली सर्व भूमी संबंधितांना परत करावी तसेच दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करावी आदी विविध मागण्यासह निवेदनावर स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे पराग गोखले यांनी सांगितले.
COMMENTS