सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात गावागावांमध्ये बैलजोडींना रंगरंगोटी तसेच सजावट करून पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढीत महाराष्ट्रीय बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मागील काळात शेतकऱ्यांच्या घरोघरी बैलजोडी असत मात्र सध्या ठराविकच बैल जोडी गावांमध्ये पाहायला मिळतात.सोमवार दि.३ महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या वेळी गावागावातील बैलजोडींची सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगानी सजावट केले गेले होते. सायंकाळी या बैलजोडींना एकत्रित रित्या ग्रामदैवताच्या मंदिरापर्यंत ग्रामप्रदक्षिणा पारंपरिक वाद्यांच्या निनादात मोठ्या उत्साहात करण्यात आली. तर बैलजोडी घरात घेताना पुरणपोळ्यांचा नैवेद्य देऊन औक्षण करीत बैलांना घरात घेण्यात आले.