बारामती ! आयुष्यातील मूल्य अंगीकारत भारत देशाचे उत्तम नागरिक व्हा - प्राचार्य संदीप जगताप : विद्या प्रतिष्ठानमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाघळवाडी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन इयत्ता सहावी ते नववी तील विद्यार्थ्यांना सोमेश्वर परिसरातील  व्याख्याते प्राचार्य संदीप जगताप यांनी मार्गदर्शन केले. 
         प्राचार्य जगताप यांनी पौराणिक कथांचा दाखला देत आताच्या आधुनिक जीवन मूल्यांची उत्तम सांगड घालत आपल्या ओजस्वी भाषण कौशल्याने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. इतिहासातील होऊन गेलेल्या श्रेष्ठ व्यक्तींच्या आयुष्यातील मूल्य अंगीकारून आपण विद्यार्थी दशेतून एक उत्तम भारत देशाचा नागरिक कसे बनू शकतो याबद्दलही सरांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका वर्षा मांढरे यांनी केले. यावेळी शाळेतील प्राचार्य सचिन पाठक तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.
To Top