सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : सचिन पवार
बारामती तालुक्यातील खराडेवाडी शिरसुफळ फाटा येथे बेकायदेशीर कत्तलखाना चालवलेल्या 22 वासरांची सुटका करून सुपे पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
यावेळी सुपे वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन ते बारा दिवसाच्या २२ वासरांची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे बेकायदेशीर कत्तलखाना चालू असल्याची. तक्रारीच्या आधारे सुपे पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखाना चालवत असल्याच्या आरोपावरून संशयिताला अटक केली. संशयितावर प्राणी संरक्षण कायदा, गोहत्या प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून 22 लहान वासराची सुटका केली.
सदर पोलीसांचा मिळालेल्या फिर्यादीनुसार संशयित अटक आरोपी याने त्याचे ताब्यातील टाटा कंपनीया ए.सी.ई. गोल्ड मॉडेलचा छोटा हत्ती नं. MH 42AQ 5582 मध्ये 2 ते 12 दिवसाची काळे पांढरे तसेच ताबडया रंगाची 22 वासरे (खोंड) किमंत सुमारे 11500 / रूपये किंमतीची जनावरे दाटीवाटीने क्रुरपने टेम्पोत भरून व त्यांना त्यान्हा जनवरांना कोणत्याही प्रकारे चारा पाण्याची सोय न करता भरगाव वेगाने टेम्पोत चालवले होते , तसेच जनावरांची कोणतीही वैदयकीय तपासणी केलेची कसलेही प्रमाण पत्र नसताना व कोणत्याही प्रकारचा जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना जनावरांची क्रुरपने वाहतुक करीत असताना पोलीस हवलदार सचिन दरेकर ,रूपेश सांळूके, दत्तात्रय धुमाळ ,ताडगे यांचा टीमला मिळुन आला.यावेळी पोलीसांनी सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करणयात आला असून गुन्हाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार जाधव हे करीत आहेत .