बारामती ! माळेगाव खुर्द येथे शेतात जुगार खेळणाऱ्या ८ जणांंवर गुन्हा दाखल : सुमारे १ लाखांचा मुद्देमाल जप्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे शेतात जुगार खेळणाऱ्या ८ जणांंवर गुन्हा  सुमारे १ लाखांचा मुद्देमाल माळेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने जप्त करण्यात आला आहे.
          याबाबत पोलीस नाईक प्रविण वायसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे बेकायदेशीर जुगारीचा खेळ चालू होता. या कारवाईत ४ मोबाईल, एक टेबल व विविध कंपनीच्या ३ दुचाकी (एम.एच.४२ ए.वाय.८४९१ , एम.एच.४२ एक्स ४०६९ ,एम.एच.४२ ए.बी.६४७४ ) असा एकूण १ लाख ७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 तर सोमनाथ सदाशिव गव्हाणे, नितीन बाळु होळकर, निलेश ऊर्फ गोट्या अनिल जाधव, रोहित ज्ञानदेव एखंडे,शफिक तय्यब पठाण, रोहित सुरेश खोमणे सर्व (रा.माळेगाव खुर्द ता.बारामती) ,रियाज रमजान बागवान, गणेश ज्ञानदेव विटकर दोघे ही (रा.माळेगाव बु ता.बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक सादिक सय्यद करीत आहेत.
To Top