बारामती ! दीपक जाधव ! बारामतीत कही खुशी..कही गम...सुप्यात अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदामुळे जल्लोश.... मात्र अनेक पदाधिकारी 'वेट ॲंड वॉच'च्या भुमिकेत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची माळ अजित पवार यांच्या गळ्यात पडल्याने सुप्यात अनेक कार्यकर्त्यांनी फटाके उडवुन जल्लोष साजरा केला. 
           राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मुंबई मधील देवगिरी निवासस्थानी आज सकाळ पासुन शिंदे - फडवीस सरकार मधील मंत्र्यांची ये - जा सुरु होती. तर राष्ट्रवादीचे आमदार देवगिरी निवासस्थानी थांबुन खलबते सुरु होते. अखेर दुपारच्या दरम्यान सर्वच खलबते बाहेर आली. त्यानंतर तातडीने अजित पवार यांनी राजभवन काठुन उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी केला. अजित पवार यांनी ३५ आमदार बरोबर घेवुन ९ जणानी शपथविधी घेतला. 
           त्यामुळे महाराष्ट्राच्या राजाकरणात मोठी उलथापालथ झाली. सुप्यातील पदाधिकारी तसेच कर्यकर्ते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे विठ्ठला..... कोणता झेंडा घेवु हाती... अशी परिस्थीती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झाली आहे.  
        त्यामुळे येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेट ॲंड वॉच च्या भुमिकेत आहेत.
          ...............................
To Top