सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयामधे कार्यरत असणाऱ्या प्रा. जयश्री भोसले यांनी नुकत्याच निकाल झालेल्या व महाराष्ट्र शासनातर्फे प्राध्यापकांसाठी घेतल्या जाणाऱ्या MH - SET परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे.
या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये प्रा.भोसले यांनी यश संपादन केले. शिक्षण संस्थेच्या वतीने संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर यांनी प्रा. भोसले यांचे अभिनंदन व सत्कार केला. या समारंभासाठी संस्थेचे सचिव भारत खोमणे, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. संजय देवकर, सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.