सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चोपडज (ता. बारामती) येथील शौर्या बाळासाहेब जगताप हिने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षेत (सेट) यश मिळवले आहे.
शौर्या हिने नुकताच पुणे येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात एम. ए. इतिहास विषयात प्रथम क्रमांक पटकावला होता. यासोबतच तिने पीएचडी प्रवेश परीक्षेतही (सेट) यश मिळविले होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ग्रामोन्नती शिक्षण मंडळाच्या नारायणगाव महाविद्यालयात डॉ. राजेंद्र रासकर यांच्या मार्गदर्शनखाली पीएचडी सुरू केली आहे. आता सेट परीक्षेतही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून तिने बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे.
ती चोपडजच्या सरपंच पुष्पलता जगताप व मराठीचे प्राध्यापक बाळासाहेब जगताप यांनी कन्या आहे.
शौर्या हिला डॉ. स्नेहा गुरगुल, प्राचार्य ए. के. मंजुळकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. राजेंद्र शेजवळ, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. शेखर मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.