सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
या वर्षी लांबलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. आज उसाची लागण, हंगाम पूर्व मशागत यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांना मदतीची गरज आहे
त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने तातडीने सभासदांना खात्यावर प्रती टन ३०० रुपये जमा करावेत अशी मागणी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी केली आहे.
खैरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणटले आहे की, राज्यातील साखर उद्योगाला मागील काही हंगामापासून चांगले दिवस आहेत मागील तीन चार वर्ष पाऊसमान चांगले असल्याने उसाचे उत्पादन अधिक होते त्याकाळात इथेनॉल, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचं कमी उत्पादन, साखर निर्यात धोरण या सर्व बाबीमुळे अधिक उत्पादन अधिक नफा मिळूनही या उद्योगाच्या दृष्टीने महत्वाचा घटक असणारा शेतकऱ्याला मात्र अधिकचे दोन रुपये मिळाले नसल्याचे चित्र आहे. या वर्षी पाऊस लाबलेला आहे शेतकरी अडचणीत आलेला असून आज उसाची लागण, हंगाम पूर्व मशागत यासाठी पैशाची गरज असल्याने त्यांना मदतीची गरज आहे सोबतच आपल्या सोमेश्वर कारखान्याचा मागील गाळप हंगामाचा आढावा घेता जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याच्या तुलनेत तोडणी वाहतूक नियोजनाचा अभाव असून साडेबारा लाख टनापेक्षा अधिक गाळप झाले आहे आणि उतारा ११.९२ टक्के आहे.
जिल्ह्यात सोमेश्वरचा गाळपात उच्चांकी राहिला असून साखर उताऱ्यात ही सोमेश्वर प्रथम क्रमांकावर राहिला आहे पंतप्रधान मोदीजी यांच्या सरकारने योग्य निर्यात धोरण अवलंबिले त्याचाही सोमेश्वर कारखान्याला फायदा झाल्याने तिथेही सोमेश्वरच प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे सोमेश्वर साखर कारखाना आर्थिक दृष्ट्या सूस्थित असून उच्चांकी दर द्यावा. सभासदांना आज गरज असूनही संचालक मंडळ कोणताही हातभार लावण्यासाठी पुढे येत नाही ही बाब गंभीर असल्याने या निवेदनाद्वारे कारखाना व्यवस्थापनास विनंती की त्यांनी तातडीने सभासदांना प्रती टन किमान ३०० रुपये द्यावेत जेणे करून सभासदांना काही प्रमाणात अडचणीच्या काळात आर्थिक मदत होईल. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता राजकीय वातावरणात जास्त अडकून पडू नका त्याऐवजी शेतकऱ्यांना पाऊस नाही, भांडवल नाही याकडे तसेच ऊस लागवड वाढण्याकडे लक्ष द्यावे. असे पत्रकात म्हणटले आहे.