सोमेश्वर रिपोर्टर टीम--
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तरडोली ग्रामपंचायत मधील सन २०२२-२३ व २०२३-२४ मधील १५ वा वित्त आयोग निधीच्या मनमानी खर्चाची व बोगस बिलांची चौकशी करा अशी मागणी उपसरपंचा सहा सदस्यांनी बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे. याबाबत संबंधीतावर योग्य ती कारवाई करावी अथवा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमी उपोषण सुरूच ठेऊ अशा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत तरडोलीचे उपसरपंच सागर पंडित जाधव व सदस्य महेंद्र जिजाबा तांबे, नवनाथ जयसिंग जगदाळे, स्वाती सतीश गायकवाड, अश्विनी श्रीकांत गाडे, अनिता उत्तम पवार व नबाबाई सोमनाथ धायगुडे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत तरडोली कार्यकारणीतील सदस्य आपणाकडे मागणी करतो कि सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षात सरपंच यांनी बोगस बिले दाखवून १५ वा वित्त आयोगातून ग्रामपंचायत चा निधी खर्च केला असून व तो खर्च करताना मासिक मिटिंग मध्ये कोणतीही चर्चा न करता बिले काढून खर्च केला आहे. सदर बिलांमध्ये cctv कॅमेरा बसवणे २ लाख ८३ हजार, १५% मागासवर्गीय खर्च ३० हजार, मागासवर्गीय LED लाईट १ लाख, फ्लड लाईट १ लाख १९ हजार, अंगणवाडी फिल्टर ६७ हजार, मोटार खरेदी करणे ३३ हजार केला असून हि सर्व कामे इंन्स्टंट सिस्टीम या एकाच ठेकेदारास देण्यात आलेली आहेत व अजून २-३ कामे त्याच नावाने देण्यात आलेली आहेत. मासिक मिटींगला प्रोसिडिंगला चर्चा न करता सरपंच यांनी स्वतःच्या मनाने मनमानी पद्धतीने खर्च करून बिले काढलेली आहेत. तरी सदर सर्व खर्चाची सखोल चौकशी व छाननी करून कार्यवाही व्हावी.
सदर चौकशी करून दि ०७/०८/२०२३ पर्यत आम्हा सदस्यांना योग्य ती कार्यवाही करुन माहिती द्यावी अन्यथा दि १०/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय तरडोली समोर उपोषणास बसू व जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तरी आपण लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी. असे निवेदनात म्हणटले आहे.
COMMENTS