सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, भोर तालुका विधी समिती व भोर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने सिदोजी थोपटे विदयालय व ज्युनियर कॉलेज खानापूर ता.भोर येथील १५३ विद्यार्थिनी,१५२ विद्यार्थ्यांना पोक्सो कायदेवषियक मार्गदर्शन करण्यात आले.
कायदेविषयक व्याख्यानमालेमध्ये भोर दिवाणी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एन. के. नागरगोजे यांनी उपस्थीत विदयार्थीनी व विदयार्थ्यांना पोक्सो कायदयाची ओळख करुन दिली तर जेष्ठ विधीज्ञ ऍड.जयश्री शिंदे यांनी पाेक्सो कायदयासंबधी कायदेविषयक माहीती दिली.तसेच ऍड.विक्रम घोणे यांनी बालकांचे मुलभूत हक्क यांविषयी माहिती दिली. यावेळी राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिवा स्वरुपा थोपटे यांनी देखील मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापक रमेश बुदगुडे जयवंत थोपटे,दीपक कुमकर उपस्थित होते.