बारामती ! अभिजित काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बा.सा.काकडे विद्यालयात वह्यांचे वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे गुरुवार दि.२७ जुलै २०२३ रोजी अभिजीत काकडे  यांच्या वाढदिवसानिमित्त निंबुत येथील 'अभिजीतभैय्या युवा मंच' यांच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वह्यांचे वाटप  धीरज जगदाळे       ( उद्योजक)  बापूराव गडदरे (उद्योजक) बाळासाहेब मोटे (उद्योजक )यांच्या वतीने  करण्यात आले.
             विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिपाली ननावरे यांनी, आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राजाराम भगत व आभार  विजय सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाला  संस्थेचे अध्यक्ष सतिश काकडे उपाध्यक्ष  .भीमराव बनसोडे व मानद सचिव .मदनराव काकडे .यांनी शुभेच्छा दिल्या. 
To Top