सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : विजय लकडे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेत काझड ता. इंदापूर येथील शेतकरी कुटुंबातील अक्षय लक्ष्मण शिंदे या युवकाची निवड झाली आहे.
अक्षय चे बारावीपर्यंतचे शिक्षण भारत चिल्ड्रेन अकॅडमी वालचंदनगर येथे झाले असून पुढील शिक्षण इंजीनियरिंग कॉलेज लोणावळा येथे झाले आहे.
अक्षय 2018 पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता या परीक्षेच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याला हे यश मिळाले
2020 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली पीएसआय पदासाठी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन खुल्या गटातून त्याची निवड झाली आहे. स्पर्धा परीक्षेचा निकाल राखून ठेवल्यामुळे या युवकास दोन ते तीन वर्षे वाट पाहावी लागली त्याच्या या निवडीमुळे काझड गावामध्येमोठ्या प्रमाणात आनंद असतो साजरा करण्यात आला.