बारामती ! बाबालाल काकडे सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर महानवर तर उपाध्यक्षपदी बाबुराव गडदरे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----  
निरा : प्रतिनिधी 
गडदरवाडी ता.बारामती येथील बाबालाल  काकडे सहकरी सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर दिनकर महानवर तर उपाध्यक्षपदी बाबुराव दशरथ गडदरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  
          मावळते अध्यक्ष भाऊसाहेब गलांडे व उपाध्यक्ष भानुदास मदने यांनी राजीनामा दिल्याने ही निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी सोसायटीची निवडणूक शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्याचे माजी सभापती प्रमोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोमेश्वर चे संचालक अभिजीत काकडे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती.  
अभिजीत काकडे यांच्या सूचनेनुसार नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली बाबालाल काकडे सोसायटी ब वर्ग मध्ये मोडत असून निवडणूक निर्णय अधिकारी एस .एम बोबडे यांनी कामकाज पाहिले. 
यावेळी सोसायटीचे सर्व संचालक, सचिव व सभासद गडदरवाडी उपस्थित होते.
To Top